Liners
ती..

रात्रीची चाहूल आता लागुनी शांतता सगळीकडे पसरली..
समुद्राची ही अथांग लाट उसळी घेऊनी हळूवार किनारी स्पर्शली..
एकांत होताच पण तो भंग करणारी ती लाट हवी..
भटकत होतो त्याच किनारी, शेवटी वाटते सोबत मात्र ती सुद्धा असावी..

© Aju:)

Published on : 2019-04-05 02:23:37Insight Thoughts

दशानन, लंकेश, लंकापति, दशग्रीव.
अनेक नाव त्याची भगवान शिवशंरकराचे असीम भक्त महापंडित आणि महाज्ञानि वेद, पुराण, नीति, दर्शनशास्त्र, इंद्रजाल चारही वेदांचा विश्वविख्यात ज्ञाता, व्यितिरित अन्य तंत्र, ग्रंथांचा रचेयीता. तीन लोकांवर ज्यांन राज्य केलं अशी ज्याची ख्याती.
शिवशंकरांच्या स्तुतीत रावण लिहतो....
    "जटाट वीग लज्जल प्रवाह पावितस्थले
    गलेऽ वलम्ब्य लम्बितां भुजंग तुंग मालिकाम्..."
रावणाद्वारा रचित आणि गायलेला स्रोत शिव तांडव स्रोत म्हणून संबोधला जातो.
महा तेजस्वी, प्रतापी, पराक्रमी, रूपवान तथा विद्वान तो
     "अहो रूपमहो धैर्यमहोत्सवमहो द्युति:।
     अहो राक्षसराजस्य सर्वलक्षणयुक्तता॥"
रावणाला स्मरुन भगवान राम ही मुग्ध होते आणि म्हणतात, सौन्दर्य, धैर्य, कान्ति आणि सर्वलक्षणयुक्त असून पण रावणात अधर्म, अहंकार बलवान नसता तर तो देवलोकचा स्वामी बनला असता.
विजयादशमीला रावण वधाने केली जाते. यावेळी रावणाचा मोठा पुतळा उभारून तो दहन केला जातो.
त्या मागचा उद्देश कधी जाणून घेतलात का..? कधी समजला का..?
काम, क्रोध आणि लोभ अधिपती तो रावण बलशाली, अहंकारी तो याच वाईट प्रवृत्तीचा विनाश करून धर्माचा, सत्याचा बाजूने उभं राहील गेल.विजय हा नेहमी सत्याचाच होतो. अधर्म, अन्यान वाईट प्रवृत्ती जास्त काळ नाही टिकत हेच रावनदहनातून सांगितल जात.
चला नवी सुरवात करू स्वतः पासून, बदल घडवू स्वतः पासून
हा दसरा तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…

© विकास येवले

Published on : 2018-12-15 06:49:20Insight Thoughts
Friends

Stories!
      Every day we live a new story or we become a part of one. And every story contains numerous people that walk into it. In the preface, each new character is defined in the story by means of a stranger. We don't choose them. They just pop in our life out of nowhere. From stranger to mate, these characters take a shape and turn our life upside down. No matter how tiny their role, they tend to define who we are, and who we become. From bizarre faces to known buddies, we get attached with them, we get habitual and used to with them. These characters are nothing but our friends. Each friend represents a world in us, a world possibly not born until they arrive, and it is only by this meeting that a new world is born.

      'A day without laughter is a day wasted.'
      -Charlie Chaplin.
Friends(figurative idiots of our lives), never let our day go without a smile or a glimpse of happy moments. They make us laugh and forget our day-to-day worries. These are the people, with whom we spend our most of the time, make memories, enjoy the little-big things.

Friends see you as you are not as they want you to be. They make you feel special, care for you, understands you. In situations, they soak up our pain like a sponge, cleansing the water from a surface. Friends never give up on us. Even after the outrages, fights they hold on to us, they have our back, no matter what. They cherish our strengths and help us overcome our weaknesses. These are the people we can rely on, we can talk to, share things, and go crazy without any hesitation. People come and go, like waves of an ocean. But friends stay, like an octopus on your face. They have the most impact on our lives.
There is no way knowing for sure where the safest place is, so the best you can hope for is to have some good company. We concoct stories with them, either happy or sad, comedy or tragedy, peaceful or chaotic, but these are the stories that we build and reminisce them throughout our lives.

© Aju :)

Published on : 2018-10-18 10:08:14Liners
स्वप्न

एका खट्याळ स्वप्नाच्या साथीने कैक दिवस सरून गेले..
डोळ्यातील दुखाचे निखरे गुलाबी हसण्याने झुरून गेले..
चाललो कित्येक वाटा, ही वाट काही साथ देईना..
त्या स्वप्नासोबत चालायचे, स्वप्नातच विरुन गेले..

© शुभ्रा

Published on : 2018-10-18 10:05:17Poem
आज म्हणलं जरा मीच माझ्याशी बोलावं..

आज म्हणलं जरा मीच माझ्याशी बोलावं
उत्तरं सापडतात पटापट या प्रश्र्नांची काय ते पहावं...

या प्रश्न-उत्तरांच्या खेळात एक डाव खेळूनच पहावं..
हारो किंवा जिंको, मीच माझ्यात गुंततो की काय हाच एक प्रश्न आता उरावं..

प्रश्नांनी प्रश्न मांडायचा की उत्तर ते सोसवेना..
अन् उत्तरातून उत्तरं द्यायची की प्रश्न करायचे तेच कळेना..

वेळ लागतो, तगमग होते,त्रास होतो, सगळं मान्य आहेच..
पण भेटतात बरं उत्तरं अन् त्याचे समाधान हे वेगळेच..

काय आश्चर्य आहे ना या प्रश्नोत्तरांचं!
मीच माझ्याशी बोलता बोलता, या प्रश्नांची उत्तरं कधी सापडली तेच उमजले नाही..

तरी राहतात काही प्रश्न ज्यांची उत्तरं नाही मांडू शकत, किंबहूना भेटत ही नाहीत..
पण ते शोधायच्या प्रयत्नात स्वत:ला ओळखायला शिकतोच ना आपण, नाही का?

© अजु

Published on : 2018-10-18 10:02:14Insight Thoughts
बस.. इतनी सी ख्वाईश है..!!

कधी कधी वाटतं, माझा देश अजाणता झालाय..,
इथे कुराण मस्जिदीपुरतं, तर गीता ही मंदिरापुरतीच मर्यादीत होऊ घातली आहे..
माणसांपर्यंत पोहोचवण्याच्या या विचारांना काही जाणत्या प्रवृत्ती थोपवू धरु पाहताएत.., आणि या सगळयांमध्ये माणुसकी सोडाच पण माणूसच दुरावतोय असं नाही वाटत का? कधी कधी मला आपसूकच एक स्वप्न पडतं.. स्वप्नामध्ये मी आपसूकच पावलं टाकत कुठल्यातरी विशिष्ट दिशेला चालल्याचा भास मला होतो.. बराच वेळ चालल्यानंतर हा मार्ग, ही दिशा कुठे जाऊन थांबणार हा प्रश्न मला सतावतोय.. आणि अशातच एक सुंदर ठिकाण त्या वाटेत मला दिसतं.. तिथल्या सगळया प्रवृत्ती, काही अंधुकशा आकृती एकमेकांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करताहेत.. पण त्यांना काय सांगायचंय एकमेकांना? हा प्रश्न मला फारच सतावतोय.. मी वाटेवरुन पुढे निघालो, मनात अनेक प्रश्नांचं कोलाहल माजलंच होतं एव्हाना.. पण तरी चालत राहीलो.. काहीतरी विशिष्ट जाणीव, संवेदना मला खेचतीए कि काय असंच काहीतरी वाटत होतं.. पावलांचा आणि मेंदूचा संबंध तुटला होता.. कुणाला कशाचं काहीच नाही.. पावलं थांबायला तयार नव्हती आणि डोक्यातील विचारांनी मेंदूचा पार चेंदामेंदा करुन टाकला होता.. इतकं सगळं घडूनही कुठूनतरी असुरी हास्य, स्मशानवाटेतल्या टिटव्यांसारखा आवाज मनाची अस्वस्थता अजूनच वाढवत होता.. आणि इतक्यात..

मेंदू सुन्न झाला.. पावलं आपसूक थांबली.. जणू काही त्यांच्यात काहीच त्राण नव्हतं.. कारणही तितकंच गंभीर.. समोर वाळवंटासारखं ठिकाण होतं.. तिथं दोन माणसं आणि एक कुत्रा दिसला... तिघांचीही अवस्था अगदीच खूप वाईट होती... जगतील कि मरतील याची काहीच शाश्वती नाही.. खाली एका छोट्याशा बरणीसारखा तुटलेला तुकडा होता.. पाणी होतं त्यात.. जेमतेम एक-दोन घोट पाणी असेन.. ती दोन माणसं अंगात कसंबसं त्राण आणून तो तुकडा घेण्यासाठी पुढे सरसावत होती.. त्यांना चालता येत नव्हतं, घसरत घसरतच त्यांचा उपद्व्याप सुरु होता.. कुत्रा बिचारा अगदीच लाचार.. निपचित.. निःशब्द पडून होता.. स्वतःचं मरण समोर असल्यावर एखादयाची काय अवस्था होते.. हे त्याला पाहून थोडंफार जाणवत होतं.. त्याला हलणं शक्य नव्हतं.. 

तिथून पुढे जे पाहीलं ते अविस्मरणीयच.. दोन्ही माणसं घसरत घसरत एकाच वेळी बरणीजवळ पोहोचली.. एकाने बरणीचा वरचा भाग घट्ट धरला तर दुसर्याने बरणीच्या तळाला आपला हात लावला होता.. जेणेकरुन पाणी पडू नये म्हणून... ते दोघे अर्धा-अर्धा घोट पाणी घेतील कदाचित.. पण कुत्र्याचं काय..? तो असाच मरणार.. माझ्यासारख्या सामान्य आणि समाजात स्वार्थी वृत्तीनं वावरणार्या माणसाला हे असं वाटणं स्वाभाविकच होतं.. अन् तत्क्षणीच त्या माणसांनी ते घोटभर पाणी त्या कुत्र्याला पाजलं... बस्स.. बस्स.. मनाची झालेली घालमेल थांबली.. निर्डावलेले डोळे आपसूकच पाणावले.. मन भरुन आलं.. सगळया डिग्र्या, सगळा पैसा, सगळं-सगळं व्यर्थ.. सगळा घमंड चकनाचूर झाला.. खाडकन् कानाखाली वाजवल्यासारखंच जणू... 

नंतर त्याच वाटेवरुन परत येत होतो.. गेल्यावेळचं ते सुंदर ठिकाण परत एकदा लागलं.. तिथे परत काहीशा अंधुक अशा आकृती आपापसात काहीतरी बोलत होत्या... गेल्यावेळी त्यांचा आवाज काही ऐकू येत नव्हता.. पण आता सगळं स्पष्ट ऐकू येत होतं.. त्यांच्या बोलण्यावरुन कळलं कि वाळवंटामध्ये जी दोन लोकं होती, त्यातला एक (अमुक-तमुक) जाती-धर्माचा होता, आणि दुसरा दुसर्या कुठल्यातरी जाती-धर्माचा होता.. अजून थोडावेळ तिथं थांबलो असतो, तर हेही ऐकायला मिळालं असतं कि आमच्या (धर्माच्या) माणसाने शहाणपणा दाखवला म्हणून कुत्र्याला नवसंजीवनी मिळाली.. पण बरं ए.. आता मी परत न जाता त्या वाळवंटातच राहायचं ठरवलंय.. जिथं माणसां-माणसांतच काय प्राण्यांमध्येही भेद नाहीए...

बस.. इतनी सी ख्वाईश है..!!

© प्रसाद शेळके

Published on : 2018-10-18 09:57:38Insight Thoughts
अनंताची प्रेयसी...!

 ती होती,आहे,नेहमीच असेल...स्वतःला विसरून त्याच्यावर प्रेम करणारी...आणि प्रेम करता करता त्याच्यातच सामावून गेलेली...तिनं जीव लावावा इतका तो मनमोहक आणि त्याच्यावरची तिची श्रद्धा,तिचं प्रेमही तितकच उत्कट...आनंद-दु:खाच्या पावसातही विरक्तीनं ओथंबलेलं...!
     जगाच्या अनादी काळापासून ते अंतापर्यंत तो आहे...चराचरात वसलेला...त्याच्या अस्तित्वाला काळाचं बंधन नाही,स्थळाचं वैशिष्ट्य नाही,कोणत्याही स्वरुपात बांधला न जाणारा तो,अगदी अनंत...आणि त्याचाच एक अंश अशी ती अद्वैता...अनंतात विलीन झालेली...अनंताची प्रेयसी...!
      पहाटेच्या दवबिंदुसारखं त्याचं अस्तित्व...मोत्यासारखं सुंदरपणे चमकणारं;पण क्षणार्धात नाहीसं होणारं...त्या एका क्षणाची ती वाट पाहत असते,आदल्या रात्रीपासून...तो एक क्षण ती धरून ठेवते अगदी आयुष्यभर...टिपून घेते त्याचं हेही रूप आणि साठवते ओंजळीत...त्या एका थेंबानही मग तिची ओंजळ भरून वाहू लागते...!
      उमलणाऱ्या फुलांच्या पाकळ्यातून तो तिला भेटतो...वाहणाऱ्या मंद झुळूकीमधून गुजगोष्टी करतो...कधी वाऱ्याच्या झोताने तिचा पदर उडवून खटयाळपणे हसतो,तर कधी चंद्राचा शीतल किरण होऊन स्पर्श करतो...!
       निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीत,कृतीत तो तिला सापडतो आणि मग ती स्वतःला हरवून बसते ..!
       त्याचं प्रत्येक स्वरूप ती इतरांना सांगण्याचा प्रयत्न करते...प्रकाशातला तो तर सगळ्यांनाच भावतो ;पण अंधारातला त्याचा असणं इतरांना कळावं यासाठी ती ज्योत बनून जळत राहते...फक्त त्याच्यासाठी...आणि शेवटच्या क्षणी झालेला आनंद उधळत,तेजोमय होऊन त्याच काळोखात ,त्याच्या अस्तित्वात ती स्वतःच अस्तित्व समर्पित करते..!
        या इहालौकिक जगाला ती कळत नाही;कारण तिचं जगंच वेगळ...फक्त दोघांचं...!त्यांच्या जगात केवळ आनंद आहे. दुःखाच्या भावनेचा इथे लवलेशही नाही.त्यांचं नातं म्हणजे अखंड चालू असणारा याग आहे,मोह्पाशांची आहुती देऊन समर्पणाचा अग्नी तेवत ठेवणारा एक मोक्षयज्ञ...निस्सीम प्रेमाच्या समिधा आणि त्यागाचं यज्ञोदक वाहून तिनं तो सतत चैतन्यमय ठेवला आहे .
        तिचा हा स्फुल्लींगाचा ठेवा देखील फक्त तिचा नाही...संपूर्ण जगासाठी या उत्स्फूर्त भावना ती निर्माण करत आलीये...झाडाच्या नाजूक देठावर इवलीशी पालवी जशी उमलते तितक्याच सहजतेने ती आपणा सर्वांच्या मनाच्या खोल कप्प्यात रुजत जाते.सावळ्या हरीवरील अगाध प्रीतीमधून कधी कोणा राधेच्या मनात तिच्या भावनेचा बीज अंकुरत,तर कृष्णमयी झालेल्या मीरेतून तो बहर वास्तव जगाला तिचं अस्तित्व पटवून देतो.
       जगातल्या प्रत्येक मनाच्या मुळाशी ती आहे...तिचं प्रेम आणि तिची अलोट भक्ती...अनंतापासून त्या अनंताशी एकरूप झालीये ती...अनंताची प्रेयसी...!

© मदुरा

Published on : 2018-10-18 09:55:31Insight Thoughts
आवर्तन...

आज दसरा... सिमोल्लंघनाचा दिवस... मग त्या सीमा विचारांच्या, कर्तृत्वाच्या, मनाच्या, मातीच्या, गावाच्या असोत... रामाने रावणाचा वध केला... वाईट प्रवृत्तींवर चांगल्याचा हा विजय मानला जातो. शस्त्रांची पूजा या दिवशी करतात, सरस्वतीची पूजा सुद्धा या दिवशी केली जाते. असं म्हणतात की शब्द हे सर्वात धारधार शस्त्र आहे. आज आम्ही दसऱ्याच्या या शुभ मुहूर्तावर सुरु करत आहोत एक नवीन उपक्रम... आमचा पहिला वहिला ब्लॉग... "आवर्तन". आवर्तन म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, लिहिणे. आमचेही अगदी तसेच. आपणाला नवीन नवीन कविता, कथा, ललित लेख, लघु लेख यांची आवर्तने इथे पाहायला मिळतील. इथे होणार आहेत आवर्तनं विचारांची, शब्दांत गुंफलेल्या सुंदर अशा कलाकृतींची, शब्दांचा हा सोहळा आजपासून आपल्यासाठी असणार आहे. आवर्तन... इथे घडवूया आवर्तनं नव्या विचारांची, सृजनाची, नवनिर्मितीची...

© अनिकेत

Published on : 2018-10-18 07:52:12Insight Thoughts
I Want You To Do Something

I want you to pause.


I want you to take a deep breath. And look around you.


Look at every little thing you see. Look at all your feelings. Look at their colors. Look at their music.


Look at all the faces around. Look at your dear ones and complete stranger ones. Look at their minds.


Look at the functioning world. Look at its revolutions. Look at its motivations and its thoughts. 


I want you to look at all your responsibilities and all the pressure. Look at the judgments. Look at the stress. Look at the society.


Look at your life. Its situation and its path. Its past and present. Look at every element in your life, living and material. 


Look at the blue effect on your soul. 


I want you to stop.


I want you to wonder.


Wonder about the universe. Wonder about the crimson feelings. Wonder about the patheticity of mortality. Wonder about the rage of stars and heartbeats. 


Wonder about the magic. Wonder about God. Wonder about its beauty. Wonder about music.


I want you to be astonished. 


Astonished about the petty life. About the insignificant issues. About negligible importance of problems and mesmerizing experience of ecstasy.


Astonished about trivial thoughts and problems. And replace them with awestruck and spellbound divinity that resides in you. Dark and Golden.


Revamped and Energized.


Winged and Vigorous.


I want you to look at yourself.I want you to start. 

Start a new journey. With new heart and new eyes. I want you to know its okay to fall. 

Go on and fall. The world looks different from the ground.

© Simply

Published on : 2018-10-18 07:50:28Poem
लेखणी

ती लेखणी... 
कोण्या बहुरुप्यासारखी... 
कधी मोरपिसात लाजणारी, कधी कांचनाने सजणारी... 

ती लेखणी... 
बालमैत्रिणीसाखी...
सानुल्या हाती हात देणारी आन नेहमी सोबत करणारी...  
 
ती लेखणी... 
ब्रह्मास्त्रासारखी ... 
दोन ओळी लिहणारी व जगाला धडक मारणारी..   
   
ती लेखणी... 
तान्ह्या बाळासारखी... 
कधी सहज व्यक्त होणारी,कधी कोड्यात पाडणारी...     

ती लेखणी... 
जिगरी यारसारखी... 
आपल्या भावना नकळत आपल्या समोर टाकणारी... 

ती लेखणी... 
मदिरेसारखी... 
पहिल्या घोटी त्रास देणारी मात्र आयुष्यभराची लत लावणारी...            

ती लेखणी...
चावीसारखी... 
हाती येत मनातील शब्द मोत्यासारखे बाहेर काढणारी... 

ती लेखणी... 
मादक रमणीसारखी... 
सहज हाती न येणारी, आल्यास भूल पडणारी... 

ती लेखणी... 
काळ्या जादूसारखी... 
कधीच न कळणारी पण जीवासोबत खेळणारी..

ती लेखणी....
बापसारखी...
प्रेमात सौम्य असणारी, कान ओढता कठोर भासणारी...

ती लेखणी...
तुझ्या माझ्या सारखी...
श्रांत होता काही क्षण मायेखाली निजणारी...

ती लेखणी... माझी संगिनी...

© शुभ्रा

Published on : 2018-10-18 07:48:13Insight Thoughts
सत्यम शिवम सुंदरम

सुरुवात आणि शेवट असं काही नसतंच मुळी, तो फक्त एक आभास असतो. आपण सगळे एका चक्रात अडकलेलो आहोत. जो तो आपल्या मायारूपी दुनियेत ज्याच्या त्याच्या आकलनाप्रमाणे सुरुवात आणि शेवट ठरवत असतो.

खूप जण जन्म म्हणजे आरंभ आणि मृत्यू म्हणजे अंत असा दोन परिस्थितीचा अंदाज लावतात पण कुठल्या बेसिस वर. कारण जन्म हा अंत असेल तर पूर्वायुष्याचा मृत्यू ही नवी सुरुवात असू शकते नवीन आयुष्याची. सगळा घोळ हा सापेक्ष बिंदू चा आहे. 

अबाधित असे एकच सत्य मी जाणते ज्याला ना सुरुवात ना अंत आहे. ज्याचा ना कधी जन्म झाला ना अंत होणार आहे. आणि ते एक तत्व आहे ते म्हणजे शिव. ही एक अनुभूती आहे नुसता अनुभव नाहीच मुळी. मृत्यू सुद्धा आनंद सोहळा वाटेल जेव्हा तुम्ही शिवमय व्हाल.

© रुचिता

Published on : 2018-10-18 07:23:05Insight Thoughts
आवर्तन

नमस्कार मंडळी, विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 
दसरा हा तसा तर साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो म्हणजे,काही नवीन, काही शुभ सुरुवात करायची असेल तर,
दसरा हा उत्तमच... आणि कदाचित म्हणूनच आज एका नवीन पर्वाला सुरुवात होतीये.. 
'आवर्तन....'
चला तर आज थोडं या आवर्तनाविषयी... 

    मित्रांनो, खरं पाहिलं तर आवर्तन हा संस्कृत शब्द... 
कैक वेळा एकच एक गोष्ट, कृती आपण करतो तेव्हा त्याला आवर्तन म्हणता येऊ शकतं ...
तसं माझं हे आवर्तन म्हणजे थोडंसं वेगळं म्हणता येईल... 
आजवरच्या आयुष्यात जे काही शिकलो, जे काही विचार 
अंतरंगात उतरवले त्यांचं आवर्तन इथे तुम्हाला पाहायला मिळेल.. 

खरं म्हणायचं ना तर हा एक यज्ञ मांडलेला आहे... 
एक महायज्ञ... जिथली यज्ञवेदी बनली आहे ती हजारो रंगीबेरंगी पुस्तकांनी... 
त्या मंडपाचा भार संभाळलाय कैक गाजलेल्या लेखण्यांच्या खांबांनी...
नुसता साधा मंडप नाहीये हा... हा आहे ' शब्दलाटामंडप'... 
या यज्ञात हवी दिली जाते ती हजारो विचारांची... नैतिकतेच्या मंत्रोउच्चारात वातावरण अगदी विशुद्ध बनून राहतं... विवेकाच्या तुपाने या विचारांचा संचार सुरु होतो,तिथे, त्या यज्ञवेदी मध्ये... आणि मग त्या पवित्र ज्वाला धडाडतात... ज्वाला, मानवी हास्याच्या, हर्षाच्या, रंगाच्या, लोभाच्या, थोड्याश्या धूसर, थोड्याश्या भडक... आणि किंबहुना पूर्वजन्मीचं 
लेणं म्हणूनच कि काय या महायज्ञाचं पौरोहित्य ते माझ्या हाती आलंय... आणि हे पेलायचं म्हणजे खरंच कर्मकठिण... या यज्ञात संकर होईल त्या सर्व थोर विचारांचा ज्यांनी तुमच्या आमच्या आयुष्याची सांगड घातलीये ... आता ह्या यज्ञातुन विचारांची कोणती याज्ञसेनी बाहेर पडते हे पाहणं खरंच कुतुहल असेल.... 
चला तर मग, बसुयात आजपासून धडाडणाऱ्या या यज्ञमंडपात, घालूया सांगड तुमच्या नि आमच्या विचारांची... आणि हो तुमच्यासारख्या थोर मोठ्यांचा आशिर्वाद असुद्या.. मग हे दिव्य सुद्धा सहज पार पडेल.. 
   असो, तुम्हा सर्वांना परत एकदा विजयादशमीच्या मन:पूर्वक शुभेच्छा.... 
  भेटू तर मग लवकरच.... 

© शुभ्रा

Published on : 2018-10-18 07:14:53